Saturday, 7 April 2012

विंडोज ८ ऑपरेटिंग सिस्टीम आली तुमच्या भेटीला

          परेटिंग सिस्टीम च्या युद्धात लायनक्स, ॅपल OS, यांवर मात करण्यासाठी 'मायक्रोसोफ्ट' पूर्ण ताकदीने उतरल आहे. मायक्रोसोफ्टच्या विंडोज ९५, ९८, 2000, XP, ME , XP-2003, विंडोज व्हिस्टा, विंडोज ७ आणि आता आगमन झाल आहे  'विंडोज ८' चे. खरोखरच  ही परेटिंग सिस्टीम कमाल आहे. विंडोज ८ चे हे 'बीटा व्हर्जन' खर तर जगभरातील टचस्क्रीन मोबाईल्स, आयपॅड, tabs  डोळ्यासमोर ठेऊन तयार केली आहे. यात गंमत म्हणजे विंडोज स्टार्ट हे बटन नाही. नेहमीचे फाईल फोल्डर एवजी तुम्हाला टायटल्स दिसतील.  ज्या टायटल्सवर तुम्ही क्लिक कराल ते ॅपलीकेशन लगेच ओपेन होईल. तुमच्या खास सोयीसाठी  ईमेल, गेम्स, मुझिक, वालपेपर, व्हिडीओ असे अनेक टायटल्स तुम्हाला यात पाहायला मिळतील. ॅपल आयपॅड च्या 'रेटीना डिस्प्ले' पेक्षा चांगले रीझोल्युशन यात तुम्हाला मिळेल असा कंपनी चा दावा आहे. वेब पेजेस स्लाईड करून ओपन करता येतील. 'मेट्रो' आणि डेस्कटोप लूक  'अलट + टेब' वर चेंज करता येतो. स्टार्टअप ला वेळ कमी, 'विंडोज- टु- गो' फंक्शन  ही त्याची गुण वैशिष्ट्ये. स्टार्ट स्क्रीन मध्ये ९ कलर्स व ५ पेटनस  ग्राहकांना  यात मिळतील.    

Friday, 6 April 2012

ऑल टाईम फेवरेट- अॅपल आयफोन ४-एस

         
    मस्कार मित्रानो!! आज आपण बघणार आहोत ओल टाईम फेवरेट ॅपल ४-एस आयफोन. जो तुम्हाला देतो एक वेगळी अनुभूती. खरच हा फोन सर्वच बाबतीत इतर उत्पादनापेक्षा सरस ठरतो. ॅपल ४-एस आयफोन मध्ये आहे डयुअल-कोर ए-५ चीप प्रोसेसर ज्याद्वारे तुम्हाला मिळेल ७ पटीने जास्त ग्राफिक स्पीड. हा फोन पूर्वीच्या त्याच्या वर्जनपेक्षा जास्त वेगाने काम करतो आणि तो तितकाच रिस्पोन्सीव देखील आहे. त्यामुळे तुम्हाला पलीकेशन लॉंच करताना, वेब ब्राउझिंग करताना, गेम्स खेळताना फूल ओंन स्पीड देतो. याची बेटरी लाईफ देखील चांगली व दीर्घ काळ टिकणारी आहे.यात आय साईट कॅमेरा आहे. ज्यात ८ मेगापिकसल रीझोलुशन क्षमता, फेस डीटेक्शन व १०८०p एच. डी.   व्हीडीओ रेकॉर्डिंग सुविधा आहे. तसेच आय. ओ. एस.  मोबाईल ओपरेटिंग  सिस्टम व रेटीना डीसप्ले ज्यामुळे अधिक शार्पनेस द्वारे आपण शब्द वाचू शकतो व  फोटो, व्हीडीओ पाहू शकतो. यात फेस टाईम कॉल हे सुविधा. ज्या मुळे कॉल करणे अधिक सुखकर होते. याच्या पलीकेशन स्टोर मध्ये ५,००,००० पस आहेत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. मग घेताय ना.. अधिक तपशिला साठी व किमतीसाठी ॅपलच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या. कारण ॅपल ४-एस आयफोन ची विदेशातली व  भारतातली किमत यात बरीच तफावत आहे. तरीही गाईज  एण्ड गर्ल्स तुम्हाला हा फोन घ्यावासा वाटला व तो तुमच्या बजेट मध्ये असेल तर तुम्ही ४-एस आयफोन ट्राय करायला हरकत नाही. 
   

Thursday, 5 April 2012

टेक गॉंड- स्टीव्ह जॉब्स


    गेल्या वर्षी कालवश झालेले स्टीव्ह जॉब्ज यांच्या ॅपलने जगभरात क्रांती घडवली. आज बरयाच टेक-वेड्या  लोकांकडे 
तुम्हाला ॅपलचे उत्पादने पहायला मिळतील. स्टीव्ह आज आपल्यात नसले तरी त्यांची उत्पादने आजहि जगभरात राज्य करत आहे. लोक - दिवस रांगेत उभे राहतात त्यांना आवडणारे ॅपल उत्पादन घेण्यासाठी आजहि आणि कालहि. स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म २४, फेब्रुवारी १९५५ रोजी  सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका  येथे झाला . गेल्या वर्षीच , ऑक्टोबर २०११ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जगावर शोककळा पसरली.
          स्टीव्ह  एक अमेरिकन व्यवसायिक होते आणि ते  ॅपल ह्या अमेरिकन कंपनीचे सहसंस्थापक मुख्याधिकारी होते. स्टीव्ह हे पूर्वी पिक्सार ॅनिमेशन स्टुडिओजचा मुख्य व्यवस्थापक होते त्यानंतर  ते  वॉल्ट डिस्ने कंपनीचे संचालक सदस्य होते . .. १९७० मध्ये जॉब्स यांनी स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर (ऍपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक तयार केला.नंतर ऍपल- या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. .. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्यांनी  राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली. .. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ऍपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्यांना पुन्हा 'ऍपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली


           जॉब्स यांना व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते. त्यांना  सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्यांनी स्वताला वाहून घेतले आहे. त्यांनी  प्रकृति अस्वास्थ्य अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून, .. २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. आयफोन, 'आयपॉड', 'आयपॅड' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आलीत आणि लोकांच्या मनात राज्य करू लागलीत. स्टीव्ह जॉब्ज हे आज जरी आपल्यात नसले तरी टेक विश्वात ते नेहमी अजरामर राहतील अशा टेक गुरूला मानाचा मुजरा.